नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी केली !

नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी धर्मशास्त्रानुसार साजर्‍या केलेल्या दीप अमावास्येची काही छायाचित्रे

नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) – नागदेववाडी येथील ग्रामस्थ दीप अमावास्येला ‘गटारी अमावास्या’, असे म्हणत असत. हा अपप्रचार आहे हे लक्षात घेऊन येथील ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी गावात या सणाविषयीचे धर्मशास्त्र सांगून याविषयी जागृती केली. याच समवेत हा सण कशाप्रकारे साजरा करणे आवश्यक आहे ? हे सांगून तो साजरा केल्यानंतर ‘दिवे लावलेली छायाचित्रे पाठवा’, असे आवाहन ग्रामस्थांना केले.

या प्रबोधनामुळे या वर्षी गावात कोणीही दीप अमावास्येविषयी अयोग्य शब्दप्रयोग केला नाही, तसेच अनेकांनी घरी धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी केली. पुढील वर्षी या संदर्भात एक पाऊल पुढे टाकत अनेकांनी गावातील प्रत्येकच घरी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला आहे ! (धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी होण्यासाठी पुढाकार घेणार्‍या ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील आणि नागदेववाडी ग्रामस्थ यांचे अभिनंदन ! इतरत्रच्या गावांनीही नागदेववाडीचे अनुकरण करावे ! – संपादक)

Leave a Comment