
रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव २७ मे ते ३० मे या कालावधीत येथील सनातन संस्थेच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने २८ ते ३० मे या कालावधीत आश्रमात ‘नवचंडीयागा’चे आयोजन करण्यात आले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला.

सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी या यागात दशद्रव्य मिश्रित पायस आदी द्रव्यांनी हवन केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, तसेच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास दूर व्हावेत अन् लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांच्या पूर्तीसाठी दैवी वातावरणात हा याग करण्यात आला. या वेळी सनातनचे साधक सर्वश्री विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि राम होनप यांनी यागाच्या संदर्भात भावपूर्ण रूपाने सूत्रसंचालनाची सेवा केली.
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...