महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या संशोधनात संस्कृत भाषा सात्त्विक असल्याचे सिद्ध !

सर्वाधिक सात्त्विक असलेली देवनागरी लिपी आणि संस्कृत साहित्य हा परात्पर गुरु डॉ. आठवले अणि कु. प्रियांका लोटलीकर यांनी लिहिलेला शोधनिबंध आधुनिक संदर्भात संस्कृत संशोधन परंपरा या विषयावरील देहली येथील राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला.

प.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उलगडलेले विश्‍वकल्याण स्वरूप !

‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्‍वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्‍वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते.

भावपूर्ण गुणवर्णनातून शब्दबद्ध केलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘गुरुमाऊलीने पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला संतरत्न उपलब्ध करून दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आम्हा देवद आश्रमातील सर्व साधकांसाठी मिळालेली ही अमूल्य भेट आहे. अध्यात्माच्या वाटेवरून जातांना ‘आध्यात्मिक आई’चे बोट धरण्याची संधी आम्हाला लाभली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा आम्हा सर्वांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा सर्वच स्तरांवर लाभ करून घेता येऊ दे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण छायाचित्ररूपात प्रसिद्ध करत आहोत.

अंतर्मुखता, साधकांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या, तसेच लहान वयात संतपद गाठून ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या देवद येथील सनातन आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

साधकांना साधनामार्गात मार्गदर्शन करणार्‍या, प्रत्येकाचे अंतर्मन जाणून त्याला साहाय्य करणार्‍या, प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्‍या आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आंतरिक तळमळ असणार्‍या सौ. अश्‍विनी पवार यांनी ७१ टक्के पातळी गाठून संतपद प्राप्त केले !

साधकांना सेवा आणि साधना यांमध्ये साहाय्य करणारे प्रेममूर्ती सद्गुरु सत्यवान कदम !

‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.

साधकांवर प्रेमाची पखरण करणार्‍या सौ. अश्‍विनी पवार ६९ व्या संतपदी विराजमान !

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सौ. अश्‍विनी पवार हिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्‍विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे, त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्‍या गोपी !

श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण केली आहे. तो प्रत्येकाला त्याचा एकेक गुण देतो; कारण एकच गुण कितीतरी जणांना शिकवू शकतो.