सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !
‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता.
