संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांना ध्यान लागण्याची प्रक्रिया

संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.

गायकाचा ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने होणारा आध्यात्मिक प्रवास

‘गातांना देव प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याला आळवत आहे’, असा गायनात भाव ठेवावा.

श्रवणभक्तीने संगीताचा आस्वाद घेणारा रसिक भक्त खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होऊ शकतो !

भगवंताविषयीचा उत्कट भाव दाटून आल्यामुळे संतांनी स्वच्छंदपणे रचलेले ‘अभंग’ हे उत्स्फूर्तपणे होणार्‍या कलेच्या आविष्काराचे मूर्तीमंत उदाहरण आहेत.

संगीताचा सराव करतांना सौ. अनघा जोशी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२५.४.२०१७ या दिवशी नामजप करतांना मला संगीतातील सप्तस्वर आकाशात दिसले. त्यानंतर सातही स्वरांनी माझ्या देहात प्रवेश केला. तेव्हा माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती झाली.

‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली.

संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !

अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.