वेदना न्यून करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी संगीत उपयुक्त असल्याचे ब्रिटीश विद्यापिठाचे संशोधन
वेदना न्यून करणे, तसेच एखाद्या दुर्धर आजारावर मात करतांना मनाची स्थिती चांगली रहावी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी, यासाठी संगीत उपचारांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संशोधन ब्रिटनमधील ‘अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी’ने केले आहे.