तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे

१. महासुदर्शन घनवटी : ‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते.

पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे

खोकल्यातून कफ पडत असल्यास अडुळशाचा रस मधातून घ्यावा. अडुळशाची २ ते ४ पाने धुऊन तव्यावर किंचित गरम करावीत. नंतर ती खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून आवश्यकता असल्यास थोडे पाणी घालून त्यांचा रस काढावा.

निरोगी रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?

पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.

आम्लपित्त : अलीकडच्या काळातील मोठी समस्या आणि त्यावरील उपाय !

आम्लपित्ताच्या त्रासामागील कारणांचा तज्ञांच्या साहाय्याने शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपचार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये पालट करण्याची सिद्धता हवी.

#Ayurved #आयुर्वेद : …रोगांचे मूळ आणि त्यावरील दैवीचिकित्सा

कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. त्यांचा समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.

#Ayurved # आयुर्वेद : कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?

‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’

निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !

आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याविषयी काही उपाय आणि घ्यावयाचा आहार !

उन्हाळ्याच्या मासांत आपल्या त्वचेची चांगली देखभाल केल्याने उन्हापासून होणारी हानी टाळता येते आणि स्वतःची त्वचा दीर्घकाळ डागमुक्त अन् तरुण ठेवण्यास साहाय्य होते. याविषयी काही सूचना येथे देत आहोत.

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

कोरोना ज्वर आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदीय उपचार

जर वैद्यांनी याप्रमाणे चिकित्सा केली, तर कोरोना ज्वर असो किंवा कुठलाही ज्वर असो रुग्णाची गंभीर परिस्थिती उद्भवणे, रुग्णाला रुग्णालयात भरती करायची वेळ येणे याची शक्यता खूप न्यून होऊ शकते.