व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
तुळशीचा रस काढण्यापूर्वी दोन्ही हात साबण लावून स्वच्छ धुवावेत. तुळशीची ७ – ८ ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यांतील पाणी झटकून टाकावे. ही पाने एकत्र करून दोन्ही तळहातांच्या मध्ये दाबत फिरवावीत. थोडा वेळ अशी फिरवल्यावर तळहाताला तुळशीचा रस लागू लागतो. तेव्हा पाने बोटांनी पिळून येणारा रस व्रणावर लावावा.’