केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

वैद्य मेघराज पराडकर

‘कित्येक लोक टीव्हीवरील विज्ञापने पाहून प्रतिदिन आवळ्याचा किंवा कोरफडीचा रस पितात. बरेच जण मधुमेहावर औषध म्हणून कुणाला न विचारता कडुनिंबाचा किंवा कारल्याचा रस पितात, जांभळाच्या बियांचे चूर्ण घेणे इत्यादी प्रकार करत असतात. ‘हे सर्व करतो, म्हणजे ‘मी आयुर्वेदानुसार आचरण करतो’, असा त्यांचा समज असतो. स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते. या पथ्यांविषयीची सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात दिली आहे. निरोगी आयुष्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करा !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०२२)

Leave a Comment