चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

Article also available in :

वैद्य मेघराज पराडकर

‘वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागतात. यांतील बर्‍याच जणांना भेडसावणारी समस्या म्हणजे ‘गुडघेदुखी’. गुडघेदुखी होऊ नये म्हणून किंवा ती असल्यास सुसह्य व्हावी, यासाठी चाळिशीनंतर प्रत्येकानेच प्रतिदिन दिवसातून न्यूनतम एकदा गुडघ्यांना तेल लावायला हवे. यासाठी कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते.’

 

गुडघ्यांना मागच्या बाजूनेही तेल लावा !

‘सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात. गुडघ्यांना तेल लावतांना ते गुडघ्यांच्या सर्व बाजूंना लावावे.’

 

उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?

‘काहीजण म्हणतात की, उभ्याने पाणी प्यायल्याने गुडघ्यांचा संधीवात होतो. खरेतर ‘उभ्याने पाणी प्यायल्याने संधीवात होतो’, याला काही शास्त्रीय आधार नाही. बसून पाणी पिणे, हे आदर्श असले, तरी ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment