‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

वरीलप्रमाणे कृती केल्यास ‘शरिरातील आमदोषाचे पचन होते (अन्नपचन नीट न झाल्याने शरिरात निर्माण झालेली विषारी द्रव्ये नष्ट होण्यास साहाय्य होते)’ आणि ‘जठराग्नी प्रदीप्त होतो (पचनशक्ती सुधारते)’.

नेहमी चहा पिणे आरोग्याला हानीकारक असल्याने तो सोडा !

बर्‍याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात.

जेवण जास्त झाल्याने होणार्‍या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.

‘हँड, फूट अँड माऊथ’ (हात, पाय आणि तोंड) या साथीच्या रोगावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

हाता-पायांवर पुरळ येणे, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक फोड येणे, ही लक्षणे असलेल्या साथीच्या रोगाला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणतात. या रोगावरील आयुर्वेदातील प्राथमिक उपचार येथे देत आहोत.

खाद्यपदार्थांच्या संदर्भात विवेक जागृत ठेवावा !

सुकामेवा खर्चिक वाटत असल्यास गूळ-शेंगदाणे, तीळ-गूळ, भाजलेले फुटाणे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ भुकेच्या प्रमाणात खावेत. पोषणमूल्यहीन आणि आरोग्य बिघडवणारे पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक, सात्त्विक आणि नैसर्गिक पदार्थ खावेत.