आम्‍लपित्त (Acidity) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, आम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून घ्‍यावी’, ही विनंती !

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे

पोटामध्‍ये आम्‍लाचे (acid चे) प्रमाण अधिक झाल्‍यास आम्‍लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट चव येणे, छातीत जळजळणे (विशेषतः रात्री जेवल्‍यानंतर), जेवलेले अन्‍न किंवा आंबट पाणी पोटातून परत तोंडात येणे, गिळायला त्रास होणे, अपचन होणे, पोटाच्‍या वरील भागात दुखणे, इत्‍यादी आम्‍लपित्ताची लक्षणे आहेत.

१. आम्‍लपित्ताचा त्रास टाळण्‍यासाठीचे घरगुती उपाय

डॉ. प्रवीण मेहता

१ अ. काय टाळावे : कॉफी, चमचमीत आणि मसालेदार पदार्थ, अति खाणे

१ आ. काय करावे ?

१ आ १. नियमित व्‍यायाम

१ आ २. केळी, सफरचंद, कलिंगड, दही खावे, शहाळ्‍याचे पाणी, ताक प्‍यावे.

 

२. होमिओपॅथी औषधे

२ अ. रोबिनिया स्‍यूडोकेसिया (Robinia Pseudocacia)

२ अ १. मळमळणे

२ अ २. सातत्‍याने अतिशय आंबट ढेकर येणे आणि उलट्या होणे

२ अ ३. घशाशी आंबट/आम्ल पाणी येणे

२ अ ४. पोटामध्‍ये तीव्र वेदना होणे, सोबत डोक्‍याची पुढची बाजू दुखणे

२ अ ५. घामाला, तसेच शौचाला आंबट वास येणे

२ अ ६. आम्‍लपित्ताचा त्रास प्रामुख्‍याने रात्रीच्‍या वेळी होणे

२ आ. सल्‍फर (Sulphur)

२ आ १. अतिमद्यसेवन, तसेच ‘पुरळ उपचाराने पूर्ण बरा होण्‍याऐवजी केवळ दडपलेला असणे’ (Suppressed eruptions) यांनंतर झालेले आम्‍लपित्त

२ आ २. आंबट ढेकर येणे, घशाशी आंबट/आम्ल पाणी येणे

२ आ ३. शरिरात सर्वत्र आग होणे

२ आ ४. सकाळी ११ वाजता अतिशय अशक्‍तपणा आणि गळून जाऊन ‘काही तरी खायलाच पाहिजे’, असे होणे

२ आ ५. दूध सेवन केल्‍यानंतर आम्‍लपित्ताचा त्रास होणे किंवा वाढणे

डॉ. अजित भरमगुडे

२ इ. नक्‍स व्‍हॉमिका (Nux Vomica)

२ इ १. पुढील प्रकारच्‍या व्‍यक्‍तींना आम्‍लपित्ताचा त्रास होणे

अ. चिंताग्रस्‍त, एकलकोंडा, उदासीन, छोट्याश्‍या आवाजाने घाबरणारा किंवा वासामुळे अस्‍वस्‍थ होणारा

आ. पुष्‍कळ मानसिक तणाव आणि बैठी जीवनशैली असणारा

इ. कॉफी, तंबाखू, मद्य यांचे व्‍यसन असलेला

२ इ २. पुढील परिस्‍थितींमध्‍ये आम्‍लपित्ताचा त्रास होणे

अ. निद्रानाश झाल्‍यामुळे

आ. अ‍ॅलोपॅथीची पुष्‍कळ औषधे घेतल्‍यामुळे

२ ई. कॅप्‍सिकम् (Capsicum)

२ इ १. पोटाच्‍या वरच्‍या भागामध्‍ये आग होणे आणि ती घशापर्यंत जाणवणे

२ इ २. पोटात पुष्‍कळ प्रमाणात गॅस धरणे आणि कधी कधी उलटी होणे

२ उ. सल्‍फुरिकम् अ‍ॅसिडम् (Sulphuricum Acidum)

२ उ १. छातीमध्‍ये जळजळ होणे, आंबट ढेकर येणे

२ उ २. मळमळ आणि त्‍यासह थंडी वाजणे

२ उ ३. पुष्‍कळ वर्षांपासून पित्ताचा त्रास असणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

२ ऊ. आर्सेनिकम् आल्‍बम् (Arsenicum Album)

२ ऊ १. आंबट पदार्थ, ‘आईस्क्रिम’ खाल्‍ल्‍यानंतर तक्रारी चालू होणे

२ ऊ २. पोटामध्‍ये अतिशय आग होणे आणि गरम पेय पिल्‍याने बरे वाटणे

२ ऊ ३. प्रत्‍येक वेळी थोडे थोडे सामान्‍य तापमान असलेले पाणी पिणे

२ ऊ ४. अतिशय काळजी, थकवा असणे

२ ए. कल्‍केरिया कार्बोनिका (Calcarea Carbonica)

२ ए १. अतिश्रमानंतर आम्‍लपित्त होणे

२ ए २. ढेकर, उलटी, जुलाब यांना आंबट दह्यासारखा वास येणे

२ ए ३. चरबीयुक्‍त पदार्थ न आवडणारा

२ ए ४. खडू, कोळसा, ‘पेन्‍सिल’, अशा प्रकारच्‍या न पचणार्‍या वस्‍तू खाव्‍याशा वाटणारा

२ ए ५. कमरेभोवती वस्‍त्र घट्ट गुंडाळले, तर ते सहन न होणारा

२ ए ६. झोपले असतांना डोेके आणि छाती यांच्‍यावर घाम येणारा

३. बाराक्षार औषध

नेट्रम् फॉस्‍फोरिकम् ६x (Natrum Phosphoricum 6x) – ४ गोळ्‍या दिवसातून ३ वेळा घेणे

Leave a Comment