शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ !
शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात.
