साबण वापरणे आरोग्याला हानीकारक

Article also available in :

गाला लावण्याचा साबण आपण कागदात गुंडाळून ठेवला, तर ४-५ दिवसांतच तो कागद जीर्ण होऊन फाटून जातो. साबण काही दिवस फरशीवर राहिला, तर फरशीवर पांढरे डाग पडतात. हे सर्व साबण बनवतांना वापरण्यात येणार्‍या कॉस्टिक सोडासारख्या हानीकारक रसायनांमुळे होते. अंघोळीसाठी नियमितपणे साबण लावल्याने त्वचेचा नैसर्गिक स्निग्धपणा निघून जातो. त्वचेला आवश्यक तो स्निग्धपणा परत मिळवण्यासाठी त्याखालील मेद, मांस, मज्जा या धातूंमधून स्नेहांश (तेलकटपणा) घ्यावा लागत असल्याने या धातूंचा स्नेहांशही न्यून होतो. यामुळे हात-पाय दुखणे, हाडे ठिसूळ होणे, चिडचिड वाढणे यांसारखे विकार निर्माण होतात. साबण वापरणे बंद केल्याने आणि अंघोळीपूर्वी त्वचेला नियमितपणे तेल लावल्याने हे सर्व विकार न्यून होऊ लागतात, असा अनुभव आहे. म्हणून निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ यांचे) पीठ अथवा वारुळावरची किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली माती वापरणे चांगले आणि स्वस्तही आहे. हे नसल्यास काही न लावता नुसतेच अंग चोळून धुतले, तरी चालते.

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ यांच्या मार्गदर्शनातून संकलित (२७.५.२०१४)

(टीप : ज्यांना काही कारणास्तव अंगाला साबण लावूूून अंघोळ करायची असेल, त्यांनी आयुर्वेदीय घटक असलेला साबण अल्प प्रमाणात वापरण्यास आडकाठी नाही. साबण वापरतांना त्वचेवरील तेलकटपणा पूर्णपणे निघून जात नाही ना, याकडे लक्ष द्यावे. )