स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
एक दिवस मी भ्रमणभाषवर अन्य काही पहात असतांना मला ‘सनातन ॲप’वर ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरामध्ये पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करावा’, असे वाचनात आले. तेव्हा मी लगेच न्यास करून तो नामजप करायला आरंभ केला.
‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणा-या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे.
देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो.
‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला.
‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो.
मी साधनेत येण्यापूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील मार्गदर्शनाचा त्या वेळी माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की, ‘ती ‘दैवी वाणी’ सतत ऐकत रहावी’, असे मला वाटत होते.
बहिणीने आरंभी नामजप न करणे, तिला साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप आणि भावप्रयोग करायला सांगितल्यावर तिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे
‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.
देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.