सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे आणि राष्ट्र, धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे..

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

रात्री उशिरा जेवण केल्याने लोकांना ‘ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोग होऊ शकतो, असे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’च्या एका अहवालामध्ये देण्यात आले आहे. हे संशोधन खाणे आणि पिणे यांच्या सवयींच्या एका माहितीवर आधारित आहे.

मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्‍लोकांचे पठण !

सूरत येथील ३६ वर्षीय महिला शस्त्रकर्माच्या सवा घंट्यामध्ये सतत श्रीमद्भगवद्गीतेतील श्‍लोकांचे पठण करत होत्या..

वर्ष २०२१ मध्ये येणार्‍या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयीची वैशिष्ट्ये !

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.

मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

काही साधक आपत्काळाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांतील आपली घरे विकून छोट्या गावांत रहायला जात आहेत. काहींना आपली घरे विकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर होण्यासाठी, तसेच घर लवकरात लवकर विकले जाण्यासाठी साधक पुढील उपाययोजना करू शकतात.

सनातन संस्थेच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.

हिंदु धर्माभिमान्यांनो, आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी शिवरायांप्रमाणे गुरुनिष्ठेचे चिलखत धारण करा !

जो अफझलखान दोन्ही हातांनी जाड लोखंडी पहार सहज वाकवू शकत होता, त्याची कट्यार शिवरायांच्या चिलखताला कशी भेदू शकली नाही ? शिवरायांचे जीवनचरित्र वाचल्यावर अफझलखान वधाचा प्रसंग काय, तसेच औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटण्याचा प्रसंग असो, तसेच शिवरायांनी केलेल्या पाच पातशाह्यांंचा केलेला संहार असो. असे कित्येक प्रसंग महाराजांवर ओढवले; परंतु…

वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा)

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८७ वर्षे होते.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

येथील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्‍वर मंदिराच्या विस्ताराचे काम चालू असतांना येथील उत्खननात १ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर नक्षीकाम केलेले आहे. याची माहिती मिळताच पुरातत्व विभागासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.