वर्ष २०२१ मध्ये येणार्या ‘गुरुपुष्यामृत योगां’विषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख आणि ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये !
१. ‘गुरुपुष्यामृत योग’ म्हणजे काय ?
‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.

२. वर्ष २०२१ मधील ‘गुरुपुष्यामृत योग’
या वर्षी ५ ‘गुरुपुष्यामृत योग’ आहेत. त्यांच्या तिथी आणि कालावधी पुढीलप्रमाणे आहे.
अ. पौष पौर्णिमा (२८.१.२०२१) : सूर्योदयापासून उत्तररात्री ३.५० पर्यंत
आ. माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी (२५.२.२०२१) : सूर्योदयापासून दुपारी १.१७ पर्यंत
इ. भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी (३०.९.२०२१) : उत्तररात्री १.३३ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत
ई. आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी (२८.१०.२०२१) : सकाळी ९.४१ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत
उ. कार्तिक कृष्ण पक्ष षष्ठी (२५.११.२०२१) : सूर्योदयापासून सायंकाळी ६.४९ पर्यंत
३. वर्ष २०२१ मधील ‘गुरुपुष्यामृत योगां’ची वैशिष्ट्ये !
अ. ३०.९.२०२१ या दिवशी असलेला ‘गुरुपुष्यामृत योग’ सूर्यास्तानंतर चालू होऊन सूर्योदयाला संपतो. सूर्यास्तानंतर असल्याने हा योग फारसा लाभदायक नाही.
आ. या वर्षी होणार्या प्रथम चार ‘गुरुपुष्यामृत योगां’त गुरु ग्रह मकर राशीत असणार आहे. (मकर राशीत गुरु ग्रह असणे, म्हणजे गुरु ग्रह त्याच्या नीच राशीत असणे.) सुवर्ण खरेदी करण्यासाठी हे ‘गुरुपुष्यामृत योग’ फारसे लाभदायक नाहीत. या काळात शारीरिक त्रास आणि आर्थिक मंदीचे संकट असण्याची शक्यता आहे.
हे सर्व ‘गुरुपुष्यामृत योग’ साधनेसाठी अनुकूल आहेत; कारण गुरु ग्रह मकर राशीत असतांना आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरूंचे आज्ञापालन करून अष्टांग साधनेचे शुभकार्य करण्याचा प्रयत्न करूया.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.१२.२०२०)

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !