रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – रात्री उशिरा जेवण केल्याने लोकांना ‘ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोग होऊ शकतो, असे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’च्या एका अहवालामध्ये देण्यात आले आहे. हे संशोधन खाणे आणि पिणे यांच्या सवयींच्या एका माहितीवर आधारित आहे. यात लोकांना झोप आणि जेवण यांची वेळ याविषयी प्रश्‍न विचारण्यात आले होते. यात प्रोस्टेट कर्करोगाच्या ६२१ केसेस आणि ब्रेस्ट कर्करोगाच्या १ सहस्र २०५ केसेसवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. ज्यात ८७२ पुरुष आणि १ सहस्र ३२१ महिला यांचा समावेश होता. यानंतर या लोकांच्या झोपेची आणि खाण्या-पिण्याच्या सवयीची तुलना सामान्य लोकांच्या सवयींसमवेत केली गेली.

यात दावा करण्यात आला आहे की,

१. रात्री जेवणानंतर लगेच झोपणार्‍या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका अधिक असतो. रात्री जेवणानंतर २ घंटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ जागणार्‍यांमध्ये ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका २० टक्के अल्प आढळून आला.

२. अभ्यासकांनी रात्री ९ वाजण्याच्या आधी जेवण करणार्‍यांमध्ये कर्करोगाचा धोका अल्प असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. रात्री १० वाजल्यानंतर जेवण करणार्‍यांमध्ये ९ वाजण्याच्या आधी जेवण करणार्‍यांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका अधिक असतो.

३. संशोधकांच्या म्हणण्यानुसार अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, शुगर ड्रिंक्स, अल्ट्रा प्रोसेस्ड सूप किंवा मीट, अल्कोहोल, धूम्रपान आणि हाय प्रोटीन डाएट यांच्यामुळेही कर्करोगाचा धोका असतो. ज्या पदार्थांमध्ये साखर, रिफायनरी तेल किंवा फॅटचे प्रमाण अधिक असते, त्याने कर्करोगाचा धोका अधिक वाढतो.

Leave a Comment