विशेष सेवेविषयी सनातनच्या साधिका प्रधान चल तिकीट परीक्षक अमरजा आठल्ये रेल्वेकडून सन्मानित !

रेल्वेतील विशेष सेवेविषयी मध्य रेल्वेच्या प्रधान चल तिकीट परीक्षक आणि सनातनच्या साधिका सौ. अमरजा आठल्ये यांना रेल्वे प्रशासनाकडून विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कुंभमेळा हा हिंदूंचे विश्वातील सर्वांत मोठे धार्मिक पर्व असून तो भारताची सांस्कृतिक महानता दर्शवणारा आणि सत्संग (संतांचा सत्संग) देणारे हे आध्यामिक संमेलन आहे. हा कुंभमेळा सत्युगापासून प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे प्रती १२ वर्षांनी भरतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘संत संपर्क’ अभियान

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘श्री निखिल चेतना केंद्रा’चे मार्गदर्शक पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते.

आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांसाठी ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले.

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये प्रतिदिन वापरण्यासाठी ‘टूथपेस्ट’ची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक रहातात. भारतभरातील सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी पुढील वर्णनाप्रमाणे एकूण ५००० टूथपेस्टची आवश्यकता आहे.

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !