धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर येथील
पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

हरिद्वार – येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जनजागृती व्हावी, या हेतूने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ‘संत संपर्क’ या अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘श्री निखिल चेतना केंद्रा’चे मार्गदर्शक पू. अनिलकुमार जोशीमहाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते. या प्रसंगी महाराजांनी त्यांच्या आश्रमामध्ये समितीच्या धर्मसेवकांना आमंत्रित केले.
पू. अनिलकुमार जोशीमहाराज हे तेलंगाणामध्ये धर्मांतर रोखणे, धर्मजागृतीच्या विषयी उपक्रम राबवणे आदी कार्य करत आहेत. या प्रसंगी श्री. चेतन राजहंस यांनी पू. जोशीमहाराज यांना सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या वेळी महाराजांनी कुंभमेळ्यामध्ये सेवेसाठी आलेल्या सर्व साधकांची २ दिवसांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे पू. जोशीमहाराज यांचे बंधू श्री. उदय जोशी यांनी महाप्रसादाच्या वेळी स्वत: उपस्थित राहून साधकांची आपुलकीने चौकशी केली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !