
सांगली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले. श्री. शिवाजीराव मोहिते यांची १ मार्च या दिवशी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि श्री. शिरीष सारडा तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी सदिच्छा भेट घेतली. ‘सी’ न्यूज ही वाहिनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यास वेळोवेळी करत असलेल्या सहकार्याविषयी श्री. मोहिते यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्या वेळी हे मनोगत व्यक्त केले.
श्री. मोहिते यांनी जिज्ञासेने श्रीकृष्णाच्या चित्राविषयी माहिती जाणून घेऊन ‘प्रतिदिन काहीकाळ तरी नामजप करीन’, असे सांगितले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !