हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार – येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्थेच्या वतीने हर की पौडी (विष्णु घाट), भीमगौडा, दक्षेश्‍वर महादेव मंदिर, सप्तर्षी मार्ग या ठिकाणी फिरता प्रसार करण्यात आला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याचसमवेत हर की पौडी येथे धर्मशिक्षण फलक लावून भाविकांना धर्माचरणाची माहिती देण्यात आली. नाविन्यूपर्ण माहिती असलेल्या या प्रदर्शनाकडे आकर्षित होऊन भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक भाविकांनी ‘आमच्या परिसरात येऊन असे प्रदर्शन लावावे’, अशी मागणी केली.

क्षणचित्रे

१. कुंभमेळा क्षेत्रात फिरते ग्रंथ वितरण करणार्‍या साधकांच्या हातातील ग्रंथ पाहून अनेक भाविक नम्रपणे ग्रंथांना नमस्कार करत होते.

२. एका जिज्ञासूने साधकांची प्रेमाने चौकशी करत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

१. एक पुजारी म्हणाले, ‘‘मी अनेक वर्षे पूजा करतो; परंतु तुमच्या ग्रंथांमध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली आहे, ती प्रथमच वाचली आहे. तुमचे कार्य चांगले असून आमच्या आश्रमात या.’’

२. कुंभमेळा क्षेत्रात फिरून ग्रंथ वितरण करणार्‍या साधकाला भेटलेल्या एका जिज्ञासूने ‘मला तुमचे सर्व ग्रंथ द्या’, असे सांगून सर्व ग्रंथ विकत घेतले. या वेळी त्यांनी सांगितले की, ग्रंथातील माहिती घरोघरी पोचणे आवश्यक आहे. तुम्ही हे सर्वांना घरोघरी जाऊन सांगा, अशीही सूचना केली.

३. दक्ष प्रजापती मंदिराचे महंत स्वामी विश्‍वेश्‍वर पुरी यांनी ‘तुम्ही धर्मासाठी चांगले कार्य करत आहात’, असे सांगून साधकांंना स्वत: प्रसाद दिला.

४. काशीपूर (उत्तराखंड) येथून आलेल्या भाविकांनी ‘आमच्या येथे ग्रंथप्रदर्शन लावा. आम्ही आपणास सर्व साहाय्य करू’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment