पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

येत्या ९ वर्षात बुडणारी शहरे (प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – ‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत जागतिक तापमान वाढीसंदर्भात एक अहवाल सिद्ध करण्यात आला आहे. ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील ९ वर्षांत जगभरातील ९ मोठी शहरे पाण्याखाली जातील.

यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे. कोलकाता शहर वर्ष २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकते. मान्सूनचा पाऊस आणि भरती यांमुळे कोलकात्यात अनेकदा पूरपरिस्थिती निर्माण होते, तसेच संपूर्ण शहरात पाणी साचते. पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच होत नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठा धोका आहे.

पाण्याखाली जाणार्‍या अन्य शहरांमध्ये अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड), बसरा (इराक) न्यू ओरलींस आणि सवाना (अमेरिका), व्हेनिस (इटली), हो ची मिन्ह (व्हिएतनाम), बँकॉक (थायलंड) आणि जॉर्जटाऊन (गयाना) यांचा समावेश आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment