दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून, प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील ॲड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि ॲड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही.

त्यामुळे पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, अशी अपेक्षा आहे.

नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे ॲड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आम्ही इशारा देत आहोत.

 

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

1 thought on “दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था”

  1. स्वभाव दोष निर्मुलनासाठी प्रयत्न केले जातात तेही दररोज नाही दर तासाला
    स्वभाव दोष निर्मुलनात स्वतः चे दोष शोधून ते घालवण्यासाठी शिक्षा पध्दतीचा वापर स्वेच्छेने साधक करतात यातून आपल्या स्वतः ला आणि सभोवतालच्या लोकांना आनंद मिळतो. चैतन्य निर्माण होतं…नामजपातून कित्येक जणांना त्यांचा खरा आनंद सापडत आहे… स्वतः चा आनंद स्वतः चे दोष घालवून स्वतःमध्ये शोधण्याचं मार्गदर्शन या संस्थेतून केलं जातं आम्ही ग्रंथ वाचले आहेत… सत्संग online मिळतात तेही विनामुल्य… यात सांगितलेलं आचरण केल्यास कित्येक जणांच्या समस्या दूर झाल्या असं वाचायला मिळालं… प्रत्येक क्षणी परमपूज्य बरोबर आहेत ही अनुभूती घेत आहे… आत्मनिवेदन या माध्यमातून आमच्या चूका ते सुधारण्यासाठी प्रयत्न हे सगळं परमपूज्यांना अंतर्मनातून सांगताना डोळ्यातून येणारे अश्रू सत्य नाहीत? त्यांनी दिलेल्या अनुभूतीची कल्पना या विश्वात कोणी करू शकत नाही. त्यांनी प्रत्येक संकटातून तारलंय… त्या शक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात. सनातन काय आहे तर ते जीवनाचं परिपूर्ण मार्गदर्शन आहे… हे सगळं सच्चिदानंद परब्रह्म यांनी लिहून घेतलं
    सत्यमेव जयते सनातन संस्था सत्य ईश्वरी वरदान आहे… त्यात चूका काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यातील ज्ञान आत्मसात केलं तर अनेक जन्माची पापं नष्ट होऊन ईश्वरकृपा सदैव होणार आहे

    Reply

Leave a Comment