सनातनच्या साधकांनी घेतली दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची सदिच्छा भेट !

(डावीकडे) ‘दैनिक जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना पंचांग भेट देतांना श्री. सुदामा शर्मा

जमशेदपूर (झारखंड) – सनातनचे साधक श्री. सुदामा शर्मा आणि सौ. रेणु शर्मा यांनी येथील राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. सनातन पंचांग पाहून श्री. ओझा यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘अनुमाने ६-७ वर्षांपूर्वी मला सनातन पंचांग मिळाले होते. ते मी अजूनही जपून ठेवले आहे.’’

श्री. ओझा यांच्या माध्यमातून मागील ४ मासांपासून दैनिक ‘जागरण’च्या स्थानिक आवृत्तीमध्ये हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रके, सनातन संस्थेने वेळोवेळी दिलेली सण-उत्सवांविषयीची शास्त्रीय माहिती, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोध प्रबंध आदी प्रकाशित करण्यात येत आहेत. या वेळी श्री. ओझा यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment