कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, कार्तिक पौर्णिमा (१८/१९.११.२०२१) या दिवशी असणारे
खंडग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

१. ग्रहण दिसणारे प्रदेश

हे चंद्रग्रहण आशिया खंडातील पूर्वेकडील प्रदेश, युरोपचा बराचसा भाग, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण अमेरिका खंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशात दिसेल.

२. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

अ. स्पर्श (आरंभ) 

दुपारी १२.४९

२ आ. मध्य

दुपारी २.३३

२ इ. मोक्ष (शेवट) 

सायंकाळी ४.१७

२ ई. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी)

३ घंटे २८ मिनिटे’

(साभार : दाते पंचांग)

टीप १ – पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment