आकुर्डी (चिंचवड) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आकुर्डी येथील भवानीमाता मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाल्याने तेथील जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !

२०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे.

नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !

नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत.

पुरामुळे बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू, तर आसाममध्ये ६ लाख लोकांना फटका !

बंगालमध्ये अलीपुरद्वार, जलपाईगुडी आणि कूच बिहार या ३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामध्ये ४ जण ठार झाले, तर ५८ सहस्र लोक बाधित झाले आहेत.

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात उपस्थित ३०० धर्माभिमान्यांनी आश्रम भेटीत आश्रमातील व्यवस्थापन, नियोजन आणि उत्साही तसेच चैतन्यमय वातावरण यांचा त्यांना लाभ झाल्याचे सांगितले.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अधिवेशन आणि सनातनचा आश्रम यांबद्दल व्यक्त केलेले मनोगत

या अधिवेशनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी येथील नियोजन, व्यवस्थापन आणि उत्साही अन् चैतन्यमय वातावरण यांचा त्यांच्यावर कोणता परिणाम होत आहे, याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !