मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता !

आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्ष

सनातनसह अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी यापूर्वीच आगामी आपत्काळात मुंबई पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचे भाकित वर्तवले आहे. अध्यात्माने जी घटना अनेक वर्षांपूर्वीच उघड केली होती, तेच आता विज्ञान सांगत आहे. यावरून ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ’ याचा प्रत्यय येतो. हे सत्य आतातरी पुरो(अधो)गामी आणि तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी स्वीकारतील का ?

नवी देहली – समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकांना वाचवण्यासाठी अजूनही योजना आखल्या जाऊ शकतात. त्यासाठी आतापासून सिद्धता करणे आवश्यक आहे. जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या राहण्याचीही सोयही नसणार आहे, असा अहवाल ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या बातमीत प्रसिद्ध झाला आहे. उपग्रहावरील छायाचित्रांमधून हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन’ या प्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या ‘मायग्रेशन’ या संस्थेतील डायना लोनेस्को यांनी ही माहिती दिली आहे. समुद्रातील पाण्याचा पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जगभरातील बरेच देश पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने वर्ष २०५० पर्यंत जगातील अनेक शहरांवर याचा विपरित परिणाम होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment