डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सोलापूर – येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सदिच्छा भेट घेऊन ‘सनातन पंचांग’ भेट दिले. या वेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हे शांतपणे समाजामध्ये हिंदु संस्कृती जपण्याचे आणि ती वाढवण्याचे मोठे कार्य निष्ठेने करत आहे. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेला ओळखतो, तुमचे कार्य चांगले आहे.’’
या प्रसंगी येथील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘नाकोडा ग्रुप’चे श्री. बाबुभाई मेहता, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे हेही उपस्थित होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !