श्रीरामजन्मभूमीविषयी येणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीरामनाम घेत स्वीकारा आणि समाजस्वास्थ उत्तम ठेवा ! – सनातन संस्था

 

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बहुप्रतिक्षित असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणीचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर समस्त हिंदु समाजाने प्रतीदिन एखादी वेळ ठरवून कुटुंबियांसह श्रीरामाचा जप करावा, रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करावी, सर्वगुणसंपन्न अशा श्रीरामाचे आदर्श गुणांचे चिंतन करून आपण ते आत्मसात करण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत, यासह या प्रकरणी जो निकाल येईल, तो समाजस्वास्थ उत्तम ठेवत स्वीकारावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे.

या प्रकरणी काही विघ्नसंतोषी समाजघटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तरी श्रीरामावर श्रद्धा ठेवत संयमाने वागावे आणि शासन-प्रशासनास सहकार्य करावे. श्रीरामाच्या नामामध्ये खूप शक्ती असल्याने अधिकाधिक जणांनी समाजाला श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन करावे. त्याच्यावर श्रद्धा ठेवून कृती केल्यास त्याच्या नामाची अनुभूती निश्‍चितच रामभक्ताला येते. ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न हिंदु समाजाने करावा, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.

आपला नम्र,

श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Comment