
रामनाथी (गोवा) – ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला. या यागाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी आणि पाठशाळेतील पुरोहित यांनी केले. प्रारंभी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यागासाठी संकल्प केला. ५ कलशांवरील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या चांदीच्या प्रतिमांवर पंचमहाभूतांचे आवाहन अन् पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचमहाभूतांसाठी हवन करण्यात आले. पूर्णाहुतीने यागाची सांगता झाली. या यागाला सनातन संस्थेचे संत, तसेच आश्रमातील साधक उपस्थित होते. प.पू. आबा उपाध्ये यांनी असे ३ याग करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार १८ ऑक्टोबर या दिवशी या शृंखलेतील शेवटचा याग करण्यात आला.

धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...