रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ

रामनाथी (गोवा) – गुरुकृपायोगानुसार साधनेची २ अंगे आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक उन्नतीसाठी करायची साधना, हे पहिले अंग, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी करायची साधना, हे दुसरे अंग आहे. नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ही सरळ अन् सोपी व्यष्टी साधना आहे, तर धर्मप्रसार करणे, ही समष्टी साधना आहे. व्यष्टी साधनेच्या पायावर समष्टी साधना उभी राहत असल्याने समष्टी साधना करणार्यांनी व्यष्टी साधना करणेही आवश्यक असते. कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात १ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.
प्रथम शंखनाद करण्यात आला. सनातन संस्थेचे श्री. संदीप शिंदे यांनी शिबिराचा हेतू सांगितला, तर आरोग्य साहाय्य समितीच्या समन्वयक अश्विनी कुलकर्णी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. या शिबिरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...