साधकांनो, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार प्रत्येक सेवा करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करा !
आश्रमातील, तसेच प्रसारात सेवा करणारे साधक विविध सेवा करतात. मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार केली, तर ती परिपूर्ण अन् भावपूर्ण होईल. ‘या योगमार्गांनुसार सेवा कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
