अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नावीन्यपूर्ण ओळख करून देणार्या सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
सनातन संस्थेच्या कलेशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध आहेत. साबण, उदबत्ती, त्रिफळा चूर्ण, दंतमंजन, उटणे, अत्तर, कापूर, कुंकू, अष्टगंध इत्यादी सात्त्विक उत्पादने बाहेरून बनवून घेतली जातात आणि त्यांची बांधणी (पॅकिंग) देवद आश्रमात केली जाते.
सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.
गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत.
आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लास्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे.
सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्या संदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.
प्रतिवर्षी मार्चमध्ये, तसेच जुलै ते सप्टेंबर या काळात शासकीय वाचनालयांना ग्रंथ खरेदीसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यानंतर त्या वाचनालयाचे संचालक विविध ग्रंथ खरेदी करतात. वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी शासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. या सर्व क्रमांकांवरील सेवा २४ घंटे उपलब्ध असतात.