रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणारे यांची आवश्यकता !

सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विविध औषधी वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. त्यांची देखभाल करणे आणि नवीन लागवड करणे या सेवांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

शेती करण्याचा अनुभव आणि लागवड करण्याची आवड असणार्‍या अन् शारीरिक सेवा करू शकणार्‍यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी खालील सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’

Leave a Comment