
‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे. सर्वांनी दिवसभरातील अधिकाधिक वेळ सत्सेवेत रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यष्टी साधनेचे, विशेषतः ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे होतील ?’, याकडेही अधिक लक्ष द्यावे.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
| आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...