
‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन करावयाचा सुधारित नामजप ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ असा आहे. हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
या सुधारित नामजपासाठीची लिंक –
https://www.sanatan.org/mr/a/824.html
हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. जे साधक स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
जे साधक आध्यात्मिक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा होईल, असे पहावे; मात्र पूर्वजांचा त्रास जाणवल्यास त्यांनीही बसून अन् मुद्रा करून दत्ताचा नामजप करावा.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०२२)
‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’
हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन
संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !
‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या
https://www.sanatan.org/Chaitanyavani

एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !