आयकर परताव्यासाठी येणार्‍या संदेशापासून सावध रहा आणि स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी अशा संदेशाकडे दुर्लक्ष करा !

मार्चच्या अखेरपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी भ्रमणभाषवर एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

साधकांनो, पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेतांना किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा !

आपत्काळाच्या दृष्टीने साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा वेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत .

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे..

औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे..

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

नागरिकांना कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास किंवा पारितोषिक लागल्याची ‘लिंक’ पाठवून ती क्लिक करण्यास सांगितले की, त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करावे. तसेच अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये !

आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

काही साधक आपत्काळाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांतील आपली घरे विकून छोट्या गावांत रहायला जात आहेत. काहींना आपली घरे विकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर होण्यासाठी, तसेच घर लवकरात लवकर विकले जाण्यासाठी साधक पुढील उपाययोजना करू शकतात.

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

‘आध्यात्मिक पातळी ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्यापेक्षा अल्प पातळीच्या साधकांना निर्णय घेणे कठीण जाते.

भीषण आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच आवश्यकतेनुसार नेत्रतपासणी करून घ्या आणि अतिरिक्त उपनेत्र (चष्मा) बनवून घ्या !

जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणारे महर्षि, तसेच द्रष्टे संत यांनी भविष्यात वर्तवल्याप्रमाणे लवकरच भीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्यामुळे ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

ज्या जिज्ञासूना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा, असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.

‘सनातन-निर्मित संतांची छायाचित्रे आणि देवतेचे चित्र यांचा आपल्या संकेतस्थळावर वापर करून अर्पणदात्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणार्‍या आध्यात्मिक संस्थेचा सनातनशी काही संबंध नाही’, हे लक्षात घ्या !

‘एका आध्यात्मिक संस्थेने गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणारा ‘व्हॉट्सॲप’ संदेश सर्वत्र प्रसारित केला. अर्पण करू इच्छिणार्‍यांना संपर्कासाठी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळाची मार्गिका (‘लिंक’) या संदेशात दिली होती.