सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्‍वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले. कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र’ उभारण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती बोलत होते.

हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

सनातन संस्थेसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री आदिनाथ आखाड्याच्या पेशवाईचे (मिरवणूक) स्वागत सप्तसरोवर मार्गावर करण्यात आले. या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

हिंदु धर्मियांची स्थिती गंभीर आहे, आमच्या श्रीमंत हिंदूंच्या आणि भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’ला सर्वाधिक बळी पडत आहेत. सर्वत्र देवतांचे विडंबन होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमचे सदैव सहकार्य राहील. आम्ही श्री स्वामीनारायण भगवान यांची भक्ती करणारे असलो, तरी प्रथम हिंदु आहोत आणि मग भगवान श्री स्वामीनारायणांचे भक्त आहोत. एक हिंदु म्हणून आम्हाला हिंदु धर्म रक्षणाचे कार्य केलेच पाहिजे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी यांनी येथे केले.

कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज यांचा सनातन संस्थेवर असलेेला विश्‍वास

कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्वर भैया दासजी महाराज म्हणाले, ‘‘मी प्रत्येक वेळी कुंभ झाल्यावर कर्जबाजारी होतो; परंतु प्रथमच या वेळी माझ्यावर कसलेच ऋण (कर्ज) झालेले नाही.

‘सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे !’ – स्वामी रामरसिक दासजी महाराज

या वर्षीच्या प्रयाग येथील कुंभमेळ्याला उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील स्वामी रामरसिक दासजी महाराज आले होते. तेव्हा ते सनातन संस्थेच्या साधकांच्या संपर्कात आले. त्यांनी सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार काढले

सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – श्री महंत पद्मानंद सरस्वती,उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधनेविषयीची माहिती देण्यात आली आहे ! – स्वामी प्रणावपुरी महाराज, मथुरा, उत्तरप्रदेश

मथुरा येथील कथावाचक स्वामी प्रणावपुरी महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.

देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर

सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे,असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले.

‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांची कुंभनगरीतील सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट !

‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी्. सिन्हा यांच्यासह १६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.