‘सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे !’ – स्वामी रामरसिक दासजी महाराज

कुंभक्षेत्री सनातन संस्थेच्या प्रदर्शनात डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना स्वामी रामरसिक दासजी महाराज

 

१. ‘सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे !’

या वर्षीच्या प्रयाग येथील कुंभमेळ्याला उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील स्वामी रामरसिक दासजी महाराज आले होते. तेव्हा ते सनातन संस्थेच्या साधकांच्या संपर्कात आले. त्यांनी सनातन संस्थेविषयी पुढील गौरवोद्गार काढले.

‘जर पूर्ण कुंभमध्ये स्पर्धा भरवली असती, तर तुमच्या संस्थेला प्रथम क्रमांक द्यावा लागला असता; कारण तुमचे प्रदर्शन आणि व्यवस्था उत्कृष्ट आहे, तसेच तुम्ही करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे.’

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी
आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांविषयी काढलेले गौरवोद्गार !

२ अ. तुमचे गुरुदेव पुष्कळ महान आहेत.

२ आ. तुमच्या गुरुदेवांनी सर्व विषयावर ग्रंथ लिहिले आहेत. तुमचे ग्रंथ
अमूल्य  असून असा एकही विषय नाही, जो तुमच्या गुरुदेवांच्या ग्रंथामध्ये आलेला नाही !

२ इ. ‘तुमचे ग्रंथ पुष्कळ अमूल्य आहेत !’

तुमच्या ग्रंथांतील ज्ञान इतके अमूल्य आहे की, त्या ग्रंथाचे मूल्य १०० – २०० रुपये असले, तरी काहीच नाही. आज काल लोक भ्रमणभाष खरेदीसाठी सहस्रो रुपये देतील; परंतु असे ग्रंथ खरेदीसाठी त्यांना पैसे द्यायला नको वाटतात.

 

३. ‘तुम्ही इतरांप्रमाणे केवळ न बोलता प्रत्यक्ष कृती करून दाखवता !’

इतर संप्रदाय, आखाडे, महाराज हे नुसते बोलतात; परंतु तुम्ही कृती करून दाखवता. ‘राम चरित मानस’मध्ये लिहिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रेमाने ‘संघे शक्ति कलौ युगे ।’ हे प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवत आहात.

 

४. ‘तुमची उत्कृष्ट व्यवस्था पाहून तुमच्या गुरुदेवांच्या सामर्थ्याची कल्पना येते !’

‘तुमची व्यवस्था उत्कृष्ट आहे. इतर ठिकाणी मुख्य महाराज असतात, तरी ते सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तुमच्या व्यवस्थेकडे पाहून ‘तुमचे गुरुदेव गोव्यात बसून सर्व गोष्टींवर लक्ष अन् नियंत्रण ठेवत आहेत आणि ते तेथे बसून सर्व सूत्रे हाताळत आहेत’, असे वाटते; म्हणून तुमची सर्व व्यवस्था उत्कृष्ट आहे. यावरून तुमच्या गुरुदेवांच्या सामर्थ्याची कल्पना येते; म्हणून मी तुमच्या आश्रमात नक्की येणार आहे.’

 

५. साधकसंख्या अल्प असूनही सर्व काही करत असलेले पाहून ‘तुम्ही साधक
असल्यामुळेच अल्प संख्या असूनही हे सारे करू शकता’, असे कौतुकाने सांगणे

शेवटच्या दिवशी आवाराआवर चालू असतांना ते आले होते आणि सर्व साहित्य पाहून ते म्हणाले, ‘तुम्ही इथे किती साधक होतात ?’, असे त्यांनी विचारले. ‘तेव्हा आम्ही साधारण १०० साधक होतो’, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘इतर ठिकाणी हीच व्यवस्था पहाण्यासाठी किमान ३०० ते ४०० लोक असतात; परंतु तुम्ही साधक आहात; म्हणून एवढ्या अल्प जणांत हे करू शकता.’

 

६. प्रति १५ मिनिटांनी साधक घोषणा देतांना पाहून गुरुदेवांच्या शिकवणीचे कौतुक करणे

ते सनातन संस्थेच्या तंबूत (पंडालमध्ये) बसले होते. तेथे साधक १५ मिनिटांनी प्रार्थना करून घोषणा देत होते. हे त्यांनी ऐकले आणि म्हणाले, ‘‘तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला हेही शिकवले आहे का ?’’ आम्ही ‘‘हो’’, असे म्हटल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे, खूपच छान ! ‘राम चरित मानसात’ लिहिले आहे की, संघटित कार्य करतांना अशा उद्घोषणा दिल्यावर वीरश्री निर्माण होते आणि उत्साह वाढतो. तुम्ही सर्व जण ‘राम चरित मानस’ जगत आहात. खूप छान ! ऐकून आनंद वाटला.’’

 

७. सनातन संस्थेच्या ग्रंथांविषयी असलेली आस्था !

ते आमची आवराआवर चालू असतांना सलग ३ दिवस येत होते. ‘त्यांना सर्व साधकांना भेटून पुष्कळ आनंद मिळत आहे’, असे जाणवत होते. ते इकडे आल्यावर म्हणायचे, ‘इकडे आलो होतो, तर मनात आले तुमचे काय चालले आहे, हे पाहूया; म्हणून आलो होतो’, असे म्हणून ते ग्रंथ घेऊन जायचे. त्यांनी असे बरेच ग्रंथ विकत घेतले होते. ते म्हणायचे, ‘‘एखादा ग्रंथ न वाचता राहू नये.’’ जर एखादा ग्रंथ अधिक झाला, तर म्हणायचे, ‘‘कोणाला तरी देता येतो.’’ वेगवेगळ्या विषयांचे ग्रंथ घेतांना ते म्हणायचे, ‘‘माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, त्यांना मी हे ग्रंथ देईन आणि हे ग्रंथ वाचून माझ्या कथांमध्ये मी हे विषय घेत जाईन; म्हणून मी हे ग्रंथ घेत आहे.’’

– श्री. शंभू गवारे, प्रयाग कुंभमेळा (२२.४.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment