
प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेने ‘मनुष्याने जीवन कसे जगावे’, ‘कसे कर्म करावे’, ‘जन्मदिवस साजरा करावा’, या संदर्भात चांगले प्रदर्शन लावले आहे. सनातन संस्था अशीच पुढे वाढत जावो, अशी मी गंगामाता आणि श्री हनुमान यांच्या चरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...