‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांची कुंभनगरीतील सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट !

भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी. सिन्हा यांनी केले अवलोकन !

धर्मशिक्षण फलकाची माहिती १. निवृत्त मेजर जनरल एस्.पी. सिन्हा यांना स्वत:हून उत्स्फूर्तपणे देतांना श्री. सुरेश चव्हाणके

प्रयागराज (कुंभनगरी) – ‘सुदर्शन न्यूज’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी्. सिन्हा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली. या प्रसंगी श्री. सुरेश चव्हाणके यांनी निवृत्त मेजर जनरल एस्.पी. सिन्हा यांना धर्मशिक्षण फलकांची माहिती स्वत:हून उत्स्फूर्तपणे दिली. सिन्हा यांनीही जिज्ञासापूर्वक प्रदर्शनाचे अवलोकन केले. या वेळी त्यांनी भूमा निकेतन पंडालमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी माहिती देणार्‍या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् समितीचे झारखंड आणि बंगाल राज्य समन्वयक श्री. शंभु गवारेे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment