सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला

‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ६ मे या दिवशी श्री चंडी होम भावपूर्ण वातावरणात पार पडला.

इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहलीच्या ऐतिहासिक परिसरात आयोजित ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सव (आय.सी.एफ्. २०२६)’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम ठरला. या महोत्सवात सनातन संस्थेने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था

अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.

हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘धर्म हा भारताचा प्राण आहे; परंतु आज आपण सणांचे मूळ चैतन्य गमावून बसलो आहोत कि काय ? अशी भीती वाटते. होळीचे रूपांतर ‘रिंग डान्स’मध्ये, नवरात्रीचे ‘हॉटेलमधील गरबा’मध्ये आणि दिवाळीचे महत्त्व केवळ ‘नरकासुर’वध किंवा फटाक्यांपुरते मर्यादित राहिले आहे.

राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !

सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ अंतर्गत राजहंसगड गावात भव्य ‘श्रीराम नामदिंडी’ उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली.

सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आपण सर्वजण आनंदाच्या शोधात असतो; मात्र सुखाच्या मागे धावल्यामुळे जीवन तणावग्रस्त होते. अध्यात्म हे एक शास्त्र असून त्याप्रमाणे आचरण केल्यामुळेच आपण खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. सध्याच्या आपत्काळात साधना आणि नामस्मरण यांविना पर्याय नाही. अध्यात्म ही आनंदी जीवन जगण्याची सुंदर कला आहे, जी शाळा-महाविद्यालयांत शिकवली जात नाही.

जय शंकर प्रतिष्ठान’चे पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान !

कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !

रामनाम संकीर्तनाचे स्वरूप : रामराज्यासाठी प्रार्थना : ५ मिनिटे, श्रीरामनामाचा जप : ५० मिनिटे, हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा : ५ मिनिटे

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागतयात्रांत सनातन संस्थेच्या वतीने ‘रामराज्या’ची संकल्पना !

ठाणे, गिरगाव आणि विलेपार्ले येथे झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांमध्ये रामसेतूची संकल्पना साकारत हातात प्रतिकात्मक शिळा घेऊन सनातन संस्थचे साधक सहभागी झाले होते.