‘सनातन संस्थेच्या वतीने बालसंस्कारवर्ग आयोजित केले जातात. ३१.१.२०२६ या दिवशी राजस्थान येथे बालसंस्कार वर्गात येणार्या मुलांच्या पालकांसाठी एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या पालकांकडून अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.

१. ‘आमची मुले बालसंस्कारवर्गात उपस्थित राहू लागल्यापासून मुलांच्या स्वभावात लक्षणीय पालट जाणवू लागला आहे. त्यांचे वर्तन निर्मळ होत आहे. त्यांची ईश्वराप्रती आस्था आणि श्रद्धा अधिक दृढ झाली आहे.
२. मुलांमध्ये ‘टिळा लावणे, श्लोकांचे पठण करणे, सकाळी मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणे, रात्री नामजप करून झोपणे’ इत्यादी उत्तम संस्कार विकसित झाले आहेत. बालसंस्कारवर्गात विविध सणांविषयी माहिती दिल्यामुळे मुलांना त्या सणांचे महत्त्व समजते.

३. एका पालकांनी सांगितले, ‘‘बालसंस्कारवर्गात शिकवल्याप्रमाणे माझा मुलगा आता स्वतःची चूक मान्य करतो. तो स्वतःहून क्षमायाचना करतो. तो त्याच्याकडून झालेल्या चुका लिहून ठेवतो आणि त्यांवर प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करतो.’’
४. एका पालकांनी सांगितले, ‘‘माझा मुलगा प्रार्थना आणि नामजप करून अभ्यास करतो. त्यामुळे माझ्या मुलाची एकाग्रता वाढली आहे. त्याच्यावरील अभ्यासाचा ताण न्यून झाला.’’
५. एका पालकांनी सांगितले, ‘‘मुलाचे दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे आणि भ्रषणभाषचा वापर करणे’, यांचे आकर्षण न्यून झाले आहे. त्याची अध्यात्माविषयी जाणून घेण्याची रुची वाढली आहे.’’
६. एक पालक म्हणाले, ‘‘बालसंस्कारवर्गाचे स्वरूप अत्यंत सुयोग्य आहे. बालसंस्कार वर्गात मुलांना आवश्यक असलेले विषय योग्य पद्धतीने समजावून सांगितले जातात. मुलांकडून चुका झाल्यास ‘त्यांना प्रायश्चित्त घेऊ शकता’, असे सांगितले जाते. त्यातूनही आम्हाला बरेच शिकायला मिळते. माझा मुलगा एकाही वर्गाला अनुपस्थित राहिला नाही.
७. एका पालकांनी सांगितले, ‘‘मुलांना बालसंस्कारवर्गात सहभागी होण्यासाठी वेगळी आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. ती स्वतःहून उत्साहाने वर्गात उपस्थित रहातात.’’
पालकांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून माझ्या लक्षात आले, ‘बालसंस्कारवर्ग मुलांवर संस्कार करणे, त्यांचे चारित्र्य घडवणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे’, यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत.’
– सौ. आशा राठी, राजस्थान (३१.१.२०२६)
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातनच्या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आदर्श आणि सुसंस्कृत पिढीची निर्मिती ! – पालक