मुंबईत होणार्‍या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या ठिकाणच्या शहरी भागांमधील सोसायटी, तर ग्रामीण भागांमध्ये गावागावांत, तसेच वाड्यांमध्ये बैठका घेऊन महायज्ञाचा प्रसार करण्यात येत आहे. यज्ञाच्या प्रसारासाठी आतापर्यंत २४३ कुटुंब बैठका, तर २५ हून अधिक सामूहिक बैठका घेण्यात आल्या. याद्वारे सहस्रो जिज्ञासूंपर्यंत महायज्ञाचे महत्त्व पोचवण्यात आले आहे.

चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सनातन संस्था’ आणि ‘मंदिर महासंघ’ यांच्या वतीने शहरातील पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात ५ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. ९ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी ६ ते १० मे २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आलेल्या या संस्कार वर्गात ४० मुलांनी सहभाग घेतला.

विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !

मुंबई येथील जागृत आणि स्वयंभू श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सनातनच्या साधकांनी गणेशाच्या चरणी श्री राजमातंगी महायज्ञाची निमंत्रणपत्रिका अर्पण केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !

सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांना या यज्ञाचा लाभ व्हावा, यासाठी मुंबई आणि उपनगर यांमध्ये फलक अन् डिजिटल स्क्रीन यांद्वारे अत्यंत प्रभावी प्रचार होत आहे.

सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे, तसेच साधकांनाही चांगले आरोग्य लाभावे अन् त्यांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ८ मे या दिवशी ‘आयुष्य होम’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते मुंबईत श्री महागणपति आणि भूमी पूजन !

श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते ७ मे या दिवशी यज्ञाच्या नियोजित पटांगणावर विघ्नहर्ता श्री महागणपति आणि भूमाता यांचे पूजन करण्यात आले.

सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला

‘हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात ६ मे या दिवशी श्री चंडी होम भावपूर्ण वातावरणात पार पडला.

इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहलीच्या ऐतिहासिक परिसरात आयोजित ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सव (आय.सी.एफ्. २०२६)’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम ठरला. या महोत्सवात सनातन संस्थेने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था

अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कौटुंबिक दायित्व यांमुळे आज शिक्षकांचा मानसिक ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ बाह्य उपायांनी नव्हे, तर नामजप, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांनी तणावावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येते.