देहली आणि ग्रेटर नोएडा (फरीदाबाद, हरियाणा) येथे आयोजित केलेल्या रा.स्व. संघाच्या ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

देहली – येथील चित्तरंजन पार्कमधील ‘सी ब्लॉक पार्क’, ‘गोपाल वाटिका, तरुण एन्क्लेव्ह’ येथे रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

ग्रेटर नोएडा (फरीदाबाद)

ग्रेटर नोएडा येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन

येथील सेक्टर डेल्टा-१ येथील मॉडर्न स्कूलमध्ये रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित ‘हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि क्रांतीकारकांचे फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

ग्रेटर नोएडा येथे लावण्यात आलेले क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन
गोपाल वाटिका येथे लावण्यात आलेले सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

क्षणचित्रे

१. ‘सी ब्लॉक पार्क’ येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला भाजप खासदार सुश्री बांसुरी स्वराज आणि आमदार सुश्री शिखा राय यांनी भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका रमा भट्टाचार्य यांनी त्या दोघींना संस्थेचे कार्य आणि ‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’, यांविषयी माहिती सांगितली. या वेळी त्या दोघींनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात.’’ या वेळी त्या दोघींनी प्रदर्शन कक्षावरून काही सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

२. ‘गोपाल वाटिका, तरुण एन्क्लेव्ह’ येथे आयोजित ग्रंथप्रदर्शनाला प्रतिष्ठित नागरिक श्री. अनुप दालमिया यांनी भेट दिली. ते म्हणाले, ‘‘मी आमच्या वसाहतीत एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. तेथे मी तुम्हाला आमंत्रित करीन.’’ त्यांना सनातन संस्थेचे प्रदर्शन पुष्कळ आवडले आणि त्यांनी विविध उत्पादने अन् ग्रंथ खरेदी केले.

३. ग्रेटर नोएडा येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांकडून पुष्कळ सकारात्मक सहकार्य मिळाले.

Leave a Comment