केरळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात ‘ऑनलाईन नामजप यज्ञ’ (सामूहिक नामजप) पार पडला !

या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला.

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक केबल वाहिनीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे’, या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन साधनावृद्धी सत्संग सोहळ्या’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. संगीता गुप्ता यांनी ‘नागपंचमीचे पूजन कसे करावे ?, नागदेवतेला प्रार्थना कशी करावी ?’ यांविषयीची माहिती सांगितली.

‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी अर्पण औषधांचे सनातन संस्थेकडून वितरण !

स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्‍या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे !

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

 जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता येऊ शकते. येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे !

चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. यासाठी येथील आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांनी ‘फेस शिल्ड’ आणि औषधे दिली.

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) येथील पूरग्रस्तांसाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

सनातन संस्था , हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.