श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील दत्तमंदिरात वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीपूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते झालेले सनातनच्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !

‘५.१२.२०२१ या दिवशी माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग येथील दत्तमंदिराच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर माणगाव येथील साधकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. दत्तमंदिरातील मूकबधीर सेवेकर्‍यांना सद्गुरु सत्यवान कदम
यांच्यातील चैतन्य जाणवून त्यांनी सद्गुरु सत्यवानदादांना नमस्कार करणे

माणगाव येथे आल्यावर सद्गुरु सत्यवान कदम यांनी माणगावची ग्रामदेवता श्री यक्षिणीदेवी हिचे दर्शन घेऊन तिला श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर त्यांनी दत्तमंदिरात जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. दत्तमंदिरातील एक सेवेकरी मूकबधीर आहेत. ते सर्वांना तीर्थप्रसाद देण्याची सेवा करतात. सद्गुरु सत्यवानदादा मंदिरात आल्यावर ते सेवक उठून उभे राहिले आणि त्यांनी सद्गुरु दादांना वंदन केले. ‘त्या मूकबधीर सेवेकर्‍याला सद्गुरूंचे चैतन्य लक्षात आले’, हे बघून आम्हा सर्व साधकांचा भाव जागृत झाला.

 

२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !

दत्तमंदिराच्या ठिकाणी २ ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आले होते. एका ठिकाणी ‘धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र’ सांगणारे फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि श्रीकृष्णाच्या चित्राचे पूजन करून या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन करण्यात आले.

 

३. प्रदर्शनाच्या निमित्ताने अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा !

ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्याची सेवा करतांना लागणारे साहित्य गुरुदेवांच्या कृपेने सहज उपलब्ध झाले.

३ अ. श्री. दिगंबर नाईक : कक्षाच्या छतासाठी लागणारे बांबू श्री. दिगंबर नाईक यांनी विनामूल्य दिले.

३ आ. श्री. उमेश देवळी : यांनी बांबू, कक्ष उभारणीसाठी लागणारे साहित्य आणि ताडपत्री विनामूल्य वापरण्यासाठी दिली.

३ इ. श्री. अर्जुन नाईक : यांनी ग्रंथप्रदर्शन कक्षासाठी स्वतःची जागा, तसेच विद्युत् पुरवठा विनामूल्य उपलब्ध करून दिला. ते स्वतः येऊन ‘साधकांना काही साहाय्य हवे आहे का ?’, याची विचारपूस करत होते.

 

४. एक व्यक्ती दुपारी गर्दीच्या वेळी सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाच्या
जवळील मार्गावरून मोठ्याने ओरडत गेली, ‘सनातनवाले चांगले काम करत आहेत !’

अशा प्रकारे सेवा करतांना साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, सद्गुरूंचा संकल्प आणि साधकांचा संघभाव अनुभवला. सर्वांना सेवेतून आनंद आणि चैतन्य मिळाले. ‘गुरुदेवांनी आम्हा साधकांकडून ही सेवा करून घेतली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. वामन परब, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. (२०.१२.२०२१)

५. सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

सद्गुरु सत्यवान कदम

५.अ. श्री क्षेत्र माणगाव येथे श्री दत्तगुरु, श्री यक्षिणीदेवी आणि प.प. टेंब्यस्वामी महाराज यांचे चैतन्य पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे सनातन-निर्मित ग्रंथांतही पुष्कळ चैतन्य असून साधकांनी सेवा करतांना या सगळ्यांचा लाभ करून घ्यायला हवा. सतत भगवंताच्या अनुसंधानात रहायला हवे.

५.आ. व्यष्टी साधना चांगली झाल्यावर समष्टी सेवाही चांगली होते आणि आनंद मिळतो. गुरूंचे मन जिंकण्याची गोष्ट म्हणजे सेवा ! प्रत्येक सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ जाण्यासाठीच असून सेवा परिपूर्ण केल्यास ती ईश्वरचरणी रुजू होते. त्यामुळे साधकांनी परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

५.इ. परात्पर गुरु डॉक्टरांंनी सर्व नियोजन अगोदरच केले आहे. सर्व सेवा आधीच पूर्ण झालेल्या आहेत. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. आपण सतत भगवंताच्या अनुसंधानात रहायला हवे.

Leave a Comment