पुणे – सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी, मंदीर स्वच्छता, गरजूंना अन्नदान, शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून थोरवे विद्यालय सातारारस्ता पुणे येथील इ. ८ वी च्या विद्यार्थांसाठी 11 मार्च या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम घेण्यात आला. डाॅ. श्री. प्रणव अर्वतकर यांनी हिंदु कालगणने नुसार एकूण ऋतु किती ? ऋतुमानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? काय खावे व काय खाण्याचे टाळावे याची सविस्तर माहिती दिली. शाळेतील 50 विद्यार्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच अंबेगाव सातारारस्ता पुणे येथील विघ्नहर्ता सोसायटी मधील महिलांसाठी प्रथमोपचार हा उपक्रम घेण्यात आला. सौ. सिमा कुटे यांनी हा उपक्रम घेतला. एखादा अपघात झाल्यानंतर डाॅक्टरांचे साहाय्य मिळेपर्यंत आपण रूग्णाची कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या उपक्रमाचा लाभ सोसायटीतील 20 महिलांनी घेतला. यावेळी हाताला जखम झाल्यानंतर त्रिकोणी पट्टीच्या सहाय्याने झोळी कशी बांधायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.


धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !