सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील रामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

वाराणसी (उत्तरप्रदेश) – प्रभु श्रीराम समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. ते सर्वार्थाने आदर्श आहेत. त्यांच्या नामात अभूतपूर्व शक्ती आहे. कलियुगात नामजपाचे अतिशय महत्त्व आहे. हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.

या वेळी श्रीरामाचे विविध गुण वैशिष्ट्ये आणि कार्य यांच्याविषयी माहिती देण्यात आली. श्रीरामाशी संबंधित माहिती आणि भावपूर्ण नामजप यांमुळे सर्व रामभक्तांचा भाव जागृत झाला. याविषयी अनेकांनी सनातन संस्थेचे कौतुक केले आणि ‘असे कार्यक्रम आवश्यक आहेत’, असे सांगितले.

Leave a Comment